पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२५ ऑगस्ट
जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील सोनेगाव येथे महावितरणच्या गलथान कारभारामुळे एक महिन्यापासून सोनेगावची जनता त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे . अधिकारी झोपा काढण्यात व्यस्त आहेत का ?असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे . सर्वसामान्य जनतेला न्याय कोण देणार असा प्रश्न नागरिकांमध्ये पडला आहे .गेले एक महिन्यांपासून सर्वसामान्य काळोख्यात आहे . सोनेगाव येथील गावठाणाची डीपी एक महिन्यापासून बंद आहे सोनेगाव ग्रामस्थांनी वारंवार अधिकाऱ्यांसोबत संपर्क करूनही डीपी चालू होत नसल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे पुढील दोन दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास खर्डा वीज केंद्रावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा सोनेगाव ग्रामस्थांनी दिला आहे येत्या २८ तारखेला खर्डा उपकेंद्रावर मोर्चा काढूनही विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास सोनेगाव ग्रामस्थांनी जामखेड सह कर्जतच्या महावितरणाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे
No comments:
Post a Comment