पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -२५ ऑगस्ट
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आज सकाळपासून गाव बंद असताना दिसत आहे. अपवाद वगळता गावातील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली होती.
सविस्तर असे की, काल दिनांक २४ ऑगस्ट रोजी भाजपाचे पदाधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील यांना जामखेड येथील न्यायालयाच्या आवारात लोखंडी टामिने मारहाण करून जखमी केले, आमच्या विरोधात साक्ष देतो काय असे म्हणत खर्डा येथील गावगुंडांकडून कडून मारहाण करण्यात आली फिर्यादी पाटील यांनी घटने विरुद्ध तात्काळ जाऊन जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला व तालुक्यात एकच खळबळ उडाली ,
तसेच काल या घटनेच्या निषेधार्थ म्हणून दिनांक २४ऑगस्ट रोजी बाजार समिती संचालक वैजीनाथ पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपाकडून निषेध व्यक्त करत आज दि. २५ ऑगस्ट ला खर्डा शहर बंद करण्याचे निवेदन निवासी नायब तहसीलदार जामखेड यांना देण्यात आले .व अशा घटना पुन्हा घडवून नयेत याकरिता आज खर्डा बंदला आज सकाळपासून उत्सुर्फ प्रतिसाद मिळाला आहे.
खर्डा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा