पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २७ ऑगस्ट
जामखेड तालुक्यातील खर्डा शहरालगत जामखेड रोडवर असलेल्या गोलेकर लवण येथील मुरलीधर गहीनीनाथ गोलेकर (वय ५७) यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या स्वयंपाक खोलीचा दरवाजा तोडून घराच्या हॉलमध्ये झोपलेले असताना चार अज्ञात चोरट्यानी मुरलीधर गोलेकर यांचेवर हल्ला करत घरातील रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा दोन लाख पाच हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या हल्ल्यात फिर्यादी हे गंभीर जखमी झाले असून त्यांचेवर जामखेड येथिल खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार अज्ञात चोरट्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या घटनेमुळे खर्डा परिसरात खळबळ उडाली असून खर्डा पोलीस चोरट्यांचा कसून तपास करीत आहेत.
या बाबत सविस्तर असे की, दि २७ आॅगस्ट रोजी रात्री
दोन वाजताचे सुमारास खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील व खर्डा शहरापासून काही अंतरावर असलेल्या जामखेड रोडवरील गोलेकर लवण येथील मुरलीधर गोलेकर हे त्यांचे राहते घराच्या हॉलमध्ये झोपलेले असताना चार अज्ञात चोरट्यानी घराचे मागील किचनचा दरवाजा कशानेतरी सोडुन घरामध्ये प्रवेश करून फिर्यादी यांना लोखंडी जाड गजाने दोन्ही हातावर, डावे पायाचे मांडीवर व डावे बरगडीवर मारहाण करून फिर्यादी यांची पत्नी यांच्या तोंडावर रग टाकुन दाबुन धरले व त्यापैकी एकाने फिर्यादी यांना आरडा ओरड करू नको असे म्हणाला असता फिर्यादीस मारहाण केल्यामुळे त्यांनी आरडा ओरड केल्याने त्याच्या हातातील चाकुने फिर्यादी यांच्या डाव्या गालावर मारून जखमी केले. त्यावेळी फिर्यादी यांच्या घरा शेजारी राहणारे त्यांचे भाऊ शत्रुघन व भावजई मनिषा हे उठले व त्यांनी आरडा ओरड केल्यामुळे सर्व अज्ञात चोरटे ९०००० रूपये किमतीचे तीन तोळे सोन्याचे गंठण, ३६०००रूपये किमतीचे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठन, १०००० रूपये किंमतीचे सुट्टे मणी व अर्धा ग्रॅम वजनाची एक नथ ६८००० रु. रोख रक्कम, असा एकुण २०४८०० रूपयांचा मुद्देमाल घेऊन किचनमधिल पाठीमागील दरवाजा मधुन पळून गेले आहेत वगैरे मजकुरचे फिर्यादीवरून अज्ञात चार चोरट्यांच्या विरूद्ध गु. र. नंबर 165/2023भा.द.वि. कलम 459, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून खर्डा पोलीस घटनेचा कसून तपास करीत आहेत.
अहमदनगरचे अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे व कर्जत उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी भेटी दिल्या असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली
या घटनेचा पुढील तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर हे करत आहेत.
No comments:
Post a Comment