पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ३१ आॅगस्ट
आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी जीवाची पर्वा न करता अहोरात्र प्राणपणाने लढणाऱ्या व लढण्याची तयारी ठेवणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञ भाव मनात ठेवून आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्याच्या पार्श्वभूमीवर आजादी का अमृत मोहत्सव अंतर्गत
"मेरी माटी मेरा देश मिट्टी को नमन विरों का वंदन" या कार्यक्रमा निमित्त खर्डा पोलीस स्टेशन येथे वीर पत्नी व शहीद जवान वीर माता तसेच माजी सैनिक सन्मान कार्यक्रम मोठय़ा उत्साहात संपन्न झाला.
आज दि. ३१ आॅगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी माजी सैनिक यांच्याशी संवाद साधून, त्यांच्या काही समस्या जाणून घेऊन आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी केले.
सैन्य दलातून सेवा निवृत्त झालेले ऑर्डनरी कॅप्टन किसन चिलगर, सुभेदार दिनकर भोरे, नायब सुभेदार उद्धव बिरंगळ , बाळासाहेब गोपाळघरे, रावसाहेब जाधव, केशव गोपाळघरे , चंद्रकांत बोलभट, बळीराम ढाळे, सुदाम शिंगटे, राजेंद्र गोपाळघरे ,सोमनाथ होनमाणे, महादेव गोपाळघरे , वीर पत्नी मंगल जायभाय , त्यांचा योग्य तो सन्मान करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर, पोलीस नाईक संभाजी शेंडे ,कॉन्स्टेबल शेषराव मस्के , बाळू खाडे ,अशोक बडे, बारवकर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस नाईक संभाजी शेंडे यांनी तर आभार पोलीस कॉन्स्टेबल म्हस्के यांनी मानले.
No comments:
Post a Comment