पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १० आॅगस्ट
खर्डा शहरातील सोनेगाव चौक ते कौतुका नदीपर्यंत असलेल्या बसस्थानकासमोरील होत असलेल्या ड्रेनेज गटार व रस्ता रुंदीकरणाचे काम चालू होते पण काही कारणास्तव ते ठेकेदाराने बंद केलेले आहे. तरी त्या कामाची लवकरात लवकर चौकशी करून ते काम तातडीने चालू करावे व नागरिकांची होणाऱ्या त्रासापासून सुटका करावी अशी मागणी खर्डा शहराच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या शिवपट्टण विकास मंचच्या वतीने करण्यात आली आहे.
या बाबतचे रितसर निवेदन देण्यात आले असून जामखेड येथिल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत सुतार यांना दिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. तसेच यावेळी दिलेल्या निवेदनात मागणी करण्यात आलेल्या कामाबाबत आगामी तीन दिवसात संबंधित ठेकेदाराची चौकशी करून हे काम सुरू करावे असेही नमुद करण्यात आले आहे.
चौकट
खर्डा शहर हे जामखेड तालुक्यातील सर्वात मोठे गांव असुन ऐतिहासिक दृष्ट्याही तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र या गावच्या विकासाकडे प्रशासनाचे म्हणावे तेवढे लक्ष नाही. त्यामुळे येथील विकास कामे होताना दिसत नाहीत. यामुळे शिवपट्टण विकास मंचच्या माध्यमातून मंचचे कार्यकर्ते आता पुढे आले आहेत
No comments:
Post a Comment