पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-८ऑगस्ट
बीड येथील दिपज्योत ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दरवर्षी बीड शहरात दहिहंडी महोत्सव साजरा केला जातो. यामाध्यमातून वेगवेगळ्या कलाकारांना दहिहंडी उत्सवामध्ये सहभागी केले जाते. मागील वर्षी प्रसिद्ध हरियाणवी डान्सर सपना चौधरी यांची बीडमध्ये दहिहंडी उत्सवाला धमाकेदार एन्ट्री झाली होती. सपना चौधरी यांचे नृत्य पाहण्यासाठी बीड शहरातील अबाल वृद्धांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यंदा राज्यस्तरीय दहिहंडी महोत्सव ऐतिहासिक ठरणार आहे. बॉलिवुड दिग्गज कलाकार दहिहंडी महोत्सवासाठी येणार असल्याची माहिती दिपज्योत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सनी भैया आठवले यांनी दिली आहे.
बीड शहरातील माळीवेस भागात प्रत्येक वर्षी दिपज्योत गुपच्या वतीने राज्यस्तरीय दहिहंडी महोत्सव साजरा केला जातो. सर्वसामान्य नागरीकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा हा महोत्सव विविध प्रसिद्ध कलाकारांच्या माध्यमातून ऐतिहासिक ठरतो. मागील वर्षी हरियाणवी प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी यांचे नृत्य पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरीकानी गर्दी केली होती. यंदाही राज्यस्तरीय दहिहंडी महोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून बॉलिवुडचा मोठा स्टार या राज्यस्तरीय दहिहंडीचे आकर्षण ठरणार आहे. दिपज्योत ग्रुपची राज्यस्तरीय दहिहंडी महोत्सव ऐतिहासिक होणार असून नागरीकांनी यंदाच्या दहिहंडी महोत्सवामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन दिपज्योत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सनी आठवले यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment