पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ९ आॅगस्ट
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील खर्डा शिवारातील कान्होबावस्ती येथून शाईने मोटारसायकल चोरी गेली असून अज्ञात चोरट्या विरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून खर्डा पोलीसांकडून सदर घटनेचा तपास करण्यात येत आहे.
सविस्तर असे की, खर्डा येथील कान्होबावस्ती येथील रमेश कोंडीबा मुरकुटे (वय ५२) रा. कान्होबा वस्ती, खर्डा यांची
होंडा कंपनीची चॉकलेटी रंगाची शाईन मोटारसायकल क्रमांक MH16DA7761 कोणीतरी आज्ञात चोरट्यानी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता फिर्यादीच्या समती शिवाय चोरून नेली आहे. यानुसार फिर्यादी गाडीमालक रमेश कोंडीबा मुरकुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन खर्डा पोलीस स्टेशनला अज्ञात मोटारसायकल चोराच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास करीत सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस एस. व्ही. शेंडे हे करीत आहेत.
ही चोरीची घटना दि. ८ आॅगस्ट रोजी रात्री ११:०० ते दि. ९ आॅगस्ट रोजी सकाळी ५:३० वाजताचे दरम्यान फिर्यादी यांचे राहते घरासमोर कान्होबा वस्ती खर्डा येथे घडली आहे
No comments:
Post a Comment