पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -१०ऑगस्ट
वाढदिवसाच्या अवांतर खर्चाला फाटा देत सुहास मदने यांचेकडून आंगणवाडीतील मुलांना खाऊ, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पत्रकारांना पत्रकार डायरीचे वाटप करण्यात आले आहे.
आजकाल समाजात वाढदिवस साजरे करण्याचे मोठे फॅड निर्माण झाले आहे. यातूनच वाढदिवस साजरा करणे म्हणजे महागडे कपडे, सजावट ,हॉटेलमध्ये बुकिंग पार्टी भोजनावळी , भला मोठा केक आणि उपस्थित मुलांना आकर्षक गिफ्ट असा वारे माप खर्च केला जातो. मात्र या खर्चाला फाटा देत मुलांमध्ये वाचन लिखाण संस्कृती रुजवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुहास मदने यांनी आपला मुलगा चिरंजीव अन्वित सुहास मदने याचा वाढदिवस अंगणवाडीमध्ये खाऊ वाटप व मराठी शाळेत वही पेन वाटप करून व खर्ड्यातील पत्रकारांना पत्रकार डायरीचे देऊन अनोख्या पध्दतीने साजरा केला .
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आज दि. १० ऑगस्ट रोजी खर्डा येथील सामाजिक कार्यकर्ते सुहास मदने यांचा मुलगा चिरंजीव अन्वित सुहास मदने याचा आज वाढदिवस अनोख्या पद्धतीन साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सुहास मदने हे नेहमीच खर्डा गावाच्या सामाजिक दृष्टिकोनातून समाजासाठी काम करत असतात त्यांनी मागील उन्हाळ्यात जिल्हा परिषद शाळेतील झाडांना ट्रॅक्टरने पाणी देऊन झाडे जगवली व नेहमीच ते समाजाच्या हितासाठी काम करत असतात , व आज त्यांचे चिरंजीव यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडीमध्ये खाऊ वाटप व मराठी शाळेत वही पेन वाटप करून व खर्ड्यातील पत्रकारांना नोटबुक देऊन त्यांनी आज वाढदिवस हा अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. यावेळी उपस्थित खर्ड्यातील पत्रकार संतोष थोरत , श्वेता गायकवाड , दत्तराज पवार , धनसिंग साळुंखे , अनिल धोत्रे ,अरण्ये सर , निकम सर ,सामाजिक कार्यकर्ते सुहास मदने , ग्रामपंचायत सदस्य मदन पाटील,मा. उपसरपंच श्रीकांत लोखंडे , वैभव जमकावळे , सामाजिक कार्यकर्ते गणेश ढगे , बबलू सुरवसे व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment