पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -१३ सप्टेंबर
गणपती मिरवणुकीत नियमाचे पालन करूनच प्रमाणात डीजेचा आवाज करा अन्यथा गुन्हे दाखल करणार असे प्रतिपादन खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी शांतता कमिटी बैठकीत केले , आज खर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने गणपती उत्सवाच्या निमित्त शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावचे सरपंच वैजीनाथ पाटील , पत्रकार संतोष थोरात , श्वेता गायकवाड, किशोर दुषी,दत्तराज पवार, आशुतोष गायकवाड, बाळासाहेब शिंदे ,धनसिंग साळुंके , पोलीस कॉन्स्टेबल शेषराव म्हस्के ,ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर ,वडार समाज संघटना अध्यक्ष बबलू सुरवसे , गणेश ढगे, संभाजी गोलेकर ,बबलू गोलेकर, अवि सुरवसे ,सुहास मदने,आकाश पवार ,बाबू गटकळ, योगेश वाळुंजकर ,तानाजी उंबारे इत्यादी उपस्थित होते
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या ते बोलताना पुढे म्हणाले की, खर्डा शहरात गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत असताना सर्व मंडळांनी अधिकृत परवाने घ्यावेत तसेच गणेश मंडळाने सार्वजनिक देखावे दाखविताना समाजामध्ये कोणतीही तेढ निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी. मिरवणुकीत रस्त्याने अडथळे असतील त्या ठिकाणचे अडथळे ग्रामपंचायतने काढून टाकावेत गणेश विसर्जन मिरवणुकीत दुसऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करून शांतता भंग केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. कायदा सुव्यवस्था जो मोडेल त्याची गय केली जाणार नाही. तसेच मिरवणुकीत डीजे साऊंड सिस्टिमचा आवाज हा शासनाचे नियमाचे पालन करूनच करावा तसेच त्याचा कोणालाही त्रास होईल अशा पद्धतीने आवाज करू नका अशी सक्त ताकीद सहाय्यक पोलीस निरीक्षक जानकर यांनी यावेळी दिली.
यावेळी संघर्ष तरुण मंडळ, छावा प्रतिष्ठान, मित्र प्रेम ग्रुप, जय बजरंग ग्रुप, जय महाराष्ट्र तरुण मंडळ, मावळा ग्रुप, राजे प्रतिष्ठान, जय हिंद तरुण मंडळ, मयुरेश्वर तरुण मंडळ, जय भगवान मित्र मंडळ, शिवछत्रपती तरुण मंडळ इत्यादी गणेश मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व खजिनदार व बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment