पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१४ सप्टेंबर
दि. .१८ ते २२ सप्टेंबर २०२३ या पाच दिवसाच्या संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर समाजाला अनुसुचितजमाती मध्ये आरक्षण अमलबजावणीचा वटहुकुम काढला जावा व यासाठी महाराष्ट्र सरकारने पाठपुरावा करावा. तरी धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे. व धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे गांभीर्याने लक्षपुरवावे व धनगर समाजाला न्याय मिळवून दयावा. या मागणीसाठी जामखेड धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने शनिवार दि. १६ सप्टेंबर जामखेड शहरातील खर्डा चौक येथे सकाळी १० : ०० वाजता चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. या बाबत पोलीस प्रशासनास निवेदन दिले आहे.
महाराष्ट्रातील १७ से १८ टक्के लोकसंख्या असलेला धनगर समाज मागील ७० वर्षापासून घटनेत असलेल्या अनुसूचित जमाती आरक्षण अमलबजावणीची मागणी करीत आहे. यासाठी अनेक अंदोलनेही झालेली आहेत. प्रत्येक सरकार व राजकीय पक्ष धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहीजे म्हणून जाहिर भूमिका घेतात. मात्र आरक्षण अमलबजावनी संदर्भात काही होत नाही. यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. यामुळे संसदेच्या विशेष अधिवेशनात धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी जामखेड धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने शनिवार दि. १६ सप्टेंबर जामखेड शहरातील खर्डा चौक येथे सकाळी १०:०० वाजता चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. तरी आपल्या न्याय व हक्कांसाठी धनगर बांधवांनी मोठ्या संख्येने अंदोलनस उपस्थित राहावे असे आवाहन आरक्षण कृती समितीच्यावतीने मोहन (मामा) गडदे व विकास मासाळ यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment