पोलीस वारंट न्युज नेटवर्क :१४ सप्टेंबर
आ. प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी पुन्हा जिल्हाध्यपदी केलेली निवड सार्थ ठरवण्यासाठी व आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसह सर्वच निवडणूकांमध्ये भाजपाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे मत भाजपाचे नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र सुरवसे यांनी व्यक्त केले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी भारतीय जनता पार्टी अहमदनगर जिल्हा कार्यकारणी जाहिर केली. त्यानुसार रविंद्र सुरवसे यांची दुसऱ्यांदा जिल्हा उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र सुरवसे अनेक वर्षांपासून भाजपाचे अगदी तनमनधनाने व आहोरात्र काम करत आहेत. आतापर्यंत त्यांनी दोन वेळा जामखेड तालुकाध्यक्षपद व कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख व त्यासोबतच जिल्हा उपाध्यक्ष पदावर काम केले असून त्यांच्या कार्यकाळत तालुक्यात मोठय़ा प्रमाणात भाजपाची सत्ता राहिली आहे. तसेच पत्नीच्या माध्यमातून पंचायत समितीचे उपसभापती पद भुषवीले आहे. तर आ. राम शिंदे एक वेळा आमदार व एक वेळा मंत्री असताना रविंद्र सुरवसे हे भाजपाचे तालुकाध्यक्ष होते. त्यांच्या पक्षबांधनीचे राज्य कार्यकारिणीत अनेक वेळा कौतुक झाले आहे.
पक्षाचे व पंचायत समिती पदाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी खर्डा परिसरातील जनतेबरोबरच तालुक्यातील जनतेला विविध विकासकामे व वैयक्तिक कामांमधून चांगल्या प्रकारे न्याय देण्याचे काम केले आहे. तसेच खर्डा ग्रामपंचायत सारखी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अनेक वर्षे भाजपाच्या ताब्यात ठेवण्याचे काम घेतले आहे. तसेच अलिकडील काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ जास्त असतानाही त्यांच्या ताब्यातून ग्रामपंचायतची सत्ता भाजपाकडे घेण्याची किमया केली आहे.
नवनिर्वाचित जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रविंद्र सुरवसे यांचे आ. राम शिंदे, खा. सुजय विखेंसह विविध मान्यवरांकडून अभिनंदन
No comments:
Post a Comment