पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १५ सप्टेंबर
जामखेड शहरापासून काही अंतरावर खर्डा रस्त्यारोडवरील आजिंक्यतारा हॉटेल समोर जामखेडहून वालवड जाणाऱ्या कीराणा माल भरलेल्या चालत्या टॅम्पोने अचानक पेट घेतला. या घटने मध्ये किराणा मालाचे व टॅम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की जामखेडहुन एम. एच २५ बी ६६८५ क्रमांकाच्या एक टॅम्पो जामखेडहून किराणा माल घेऊन भुम तालुक्यातील वालवडकडे चालला होता. जामखेड खर्डा रस्त्यावरील आजिंक्यतारा हॉटेल समोरुन जात आसताना या टॅम्पोने अचानक पेट घेतला. टेम्पोने आचनक पेट घेतल्याने काही समजण्याच्या आतच आगीचे लोळ बाहेर पडु लागले. दोन्ही बाजुने वाहातुक थांबली गेली. आगीची तीव्रता लक्षात घेत नगरपरिषदेच्या आग्नीशामक ताबडतोब दाखल झाले. तसेच वाहातुक नियंत्रणात आणण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता गिरी, पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती, सहाय्यक फौजदार लहु यादव, पोलीस कॉन्टेबल दिनेश गंगे , सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, आग्नीशामक कर्मचारी अय्यास शेख, विजय पवार, राजु माने तर स्थानिक कार्यकर्ते प्रविण बहीर, भाऊसाहेब तनपुरे, दादासाहेब जगदाळे, दादा बहीर यांनी आग विझवण्यासाठी मदत केली.
आग जरी विझवली आसली तरी या घटनेतकिरणामालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. टेंम्पोचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
No comments:
Post a Comment