पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१६ सप्टेंबर
लंपी स्किन रोगाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार बंद जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातुन खर्डा येथील उपबाजार समितीत प्रत्येक आठवड्याल्या पशुधन बाजार सुरू करण्याचा निर्णय जामखेड बाजार समितीने घेतला असुन गुरुवार दि. २१ सप्टेंबर पासुन प्रत्येक गुरुवारी हा बाजार नियमित ठिकाणी सुरू होणार आहे. अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले यांनी दिली आहे.
जामखेड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या पशुधन (बैल) बाजारत शेजारील अनेक तालुक्यातून तसेच जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात पशुधन विक्रीसाठी येत असते. त्यामुळे येथे प्रत्येक बाजारी लाखों रूपयांची उलाढाल होत असते. मात्र सद्या सुरू असलेल्या जनावरांच्या लंपी स्किन आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाने हा बाजार तात्पुरता बंद ठेवण्यात आल्याने शेतकरी व पशुपालक यांची मोठी अडचण व नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर सभापती शरद कार्ले व संचालक मंडळाने बैठक घेऊन खर्डा या ठिकाणी हा पशुधन बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी वर्गाला पशुधन खरेदी विक्री साठी दर शनिवारी भरणा-या जामखेडच्या आठवडा बाजारासोबत आणखी एक नवा पर्याय मिळणार आहे.
सध्या अहमदनगर जिल्ह्यात लंपीच्या साथीमुळे जनावरांचे बाजार भरविण्यात अडचणी निर्माण झाल्या असल्या कारणाने सुरवातीला खर्डा येथे शेळी, मेंढी, बोकड या पशुधनाच्या खरेदी विक्रीसाठी खर्डा येथे नवीन पशुधन बाजार सुरू करून देण्याच्या निर्णय जामखेड बाजार समितीकडुन घेण्यात आला आहे.
खर्डा परिसरातील शेतकऱ्यांनी या बाजारात आपले पशुधन विक्रीसाठी आणावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment