पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ३० सप्टेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतच्या भोगळ व गैरकारभाराची माहिती मिळावी व चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या कामांना स्थगिती देऊन त्यापोटी दिलेल्या चेकचे पेमेंट थांबवावे यासाठी शिवपट्टण विकास युवा मंचच्या वतीने वेळोवेळी निवेदनाव्दारे मागणी करून तसेच अंदोलनाचा इशारा देऊनही खर्डा ग्रामपंचायत प्रशासन त्यास कोणत्याही प्रकारे दाद देत नसल्याने शिवपट्टण विकास युवा मंचचे पदाधिकारी गणेश ढगे यांनी खर्डा ग्रामपंचायत समोर स्वतःला जाळून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र नागरिकांनी गणेश ढगे यांना आत्मदहन करू न दिल्याने पुढील अनर्थ टळला.
खर्डा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खर्डा येथील विविध समाज घटकातील अनेक तरूणांनी एकत्र येत शिवपट्टण विकास युवा मंचची या संघटनेची स्थापना केली. खर्डा शहराचा विकास व्हावा यासाठी विविध प्रशासनाच्या माध्यमातून होत असलेल्या कामाबद्दल जनजागृती व त्यावर अंकुश ठेऊन चांगली व दर्जेदार कामे करून घेण्यासाठी काम करत असताना या संघटनेने केलेल्या कोणत्याही मागणी किंवा अंदोलनाला दाद न देता ग्रामपंचायत प्रशासन मनमानी व भोंगळ कारभार करत असल्याचा आरोप संघटनेचे पदाधिकारी यांनी वेळोवेळी केला आहे.
त्या अंतर्गतच शिवपट्टण विकास मंचने वेळोवेळी दिलेल्या निवेदनाव्दारे खालील प्रमाणे मागण्या केल्या. त्यानुसार दि. ५ जून २०२३ पासून ग्रामपंचायत अंतर्गत केलेली कामे व त्या कामांपोटी दिलेले व वटवलेल्या धनादेश (चेक) याची सविस्तर माहिती मिळावी तसेच संशयित रित्या दिलेले चेक यांची चौकशी करून सदर चेकचे पेमेंट थांबवावे व केलेल्या कामांचे इस्टीमेट यांच्या नकला द्याव्यात.
JIO कंपनीने ग्रामपंचायत हद्दीत केलेल्या कामाबद्दल खर्डा ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीत भरलेल्या १९ लाख ८३ हजार रूपयांपैकी ग्रामपंचायत मार्फत १० लाख रुपये खर्चून कोणकोणती कामे केली. या कामांबाबत सविस्तर माहिती मिळावी तसेच सुरू असलेल्या इतर कामांना स्थगिती देऊन त्यांच्या पेमंटलाही स्थगिती द्यावी व याबाबत सर्व सविस्तर माहिती मिळावी.
दि. २७ /६/२०२३ पुर्वीचा खर्डा ग्रामपंचायतकडे किती ग्रामनिधी शिल्लक आहे. २८ /६/२०२३ नंतर खर्डा ग्रामपंचायतने ग्रामनिधी व १५ व्या वित्त आयोगातून कोणकोणती कामे केली याबाबत सविस्तर माहिती तसेच २७ /६/२०२३ पुर्वीही झालेल्या कामांची माहिती द्यावी तसेच त्या कामांना स्थगिती देऊन कामे बंद करावीत अश्या मागण्या असलेली अनेक निवेदने देऊनही तसेच माहिती देऊन मागण्या मान्य न झाल्यास तिव्र अंदोलनाचा इशारा देऊनही खर्डा ग्रामपंचायत प्रशासन कशालाही दाद देत नसल्याने शिवपट्टण विकास युवा मंचच्या गणेश ढगे या पदाधिकारी असलेल्या तरूण कार्यकर्त्याने आज दि. ३० सप्टेंबर रोजी खर्डा ग्रामपंचायतची मासिक मिटींग सुरू असताना ग्रामपंचायत समोर अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
चौकट
खर्डा ग्रामपंचायतच्या गैरकारभाराची चौकशी व्हावी व सदर गैरकारभार थांबवावा यासाठी शिवपट्टण विकास युवा मंचचे अध्यक्ष बबलु आण्णा सुरवसे यांनीही काही दिवसांपूर्वी अश्याच प्रकारचे अंदोलन केले होते. मात्र त्याचीही खर्डा ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नव्हती.
No comments:
Post a Comment