पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२९ सप्टेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर मित्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खर्डा यांच्या वतीने करण्यात आले होते . रक्तदान शिबिरास आज उस्तुर्फ प्रतिसाद मिळाला असून ऐकून १९७ नागरिकांनी रक्तदान केले आहे.
आज सकाळ पासूनच रक्तदात्यांची मोठी रांग लागली असून रक्तदान करण्यासाठी खर्डा व खर्डा परिसरातून बरेच रक्तदाते खर्डा एसटी स्टँडवर रक्तदान करण्यासाठी उपस्थित राहिले होते .रक्तदानाचे आयोजन विजयसिंह गोलेकर मित्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खर्डा यांनी केले होते. कार्यक्रमाचे सहकार्य दत्तराज पवार पत्रकार यांनी केले यावेळी
उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना "ब्लूटूथ एअर बड्स ' चे वाटप करण्यात आले . यावेळेस उपस्थिती राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर,अक्षय सुर्वे, माजी उपसरपंच श्रीकांत लोखंडे, डॉक्टर लाड, हमीद मदारी ,सुभाष मुसळे ,हरिदास चव्हाण,नितीन ढाळे, दत्तात्रय कदम,योगेश मुळे ,सचिन शिकारे ,रोहित माने, अमोल भोसले, विशाल भोसले, निलेश गोलेकर,जितू गोलेकर, कपिल लोंढे, बाप्पू ढगे, गुरूराज पवार, विकास शिंदे, हरी भाऊ गोलेकर, इत्यादी राष्ट्रवादी कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment