पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २२ सप्टेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मदारी वस्ती येथे यशवंतराव मुक्त वसाहत योजनेअंतर्गत ४८ मदारी बांधवांना घरकुल मंजूर झाली. यशवंतराव मुक्त वसाहती योजनेअंतर्गत त्यांना एक हेक्टर जागा पण मिळाली परंतु घरकुलासाठी १ लाख ५३ हजार असल्यामुळे त्या पैशांमध्ये घरकुल पूर्ण होत नाही त्यासाठी मदारी वस्तीवर सरपंच संजीवनी वैजीनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, गावकरी, ग्रामपंचायत सदस्य या बैठकीमध्ये उपस्थित होते. यावेळी सिमेंट, वीट, कच, कलर, फरशी साठी हातभार लावण्याचे काम गावकरी करणार असल्याचे बैठकीत ठरले.
आज दिनांक २२/०९/२०२३ रोजी मदारी वस्ती खर्डा येथे झालेल्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी सर्व गावकऱ्यांशी चर्चा केली व ग्रामपंचायत व गावकरी यांनी मदत करण्याचे आश्वासन दिल्याने त्यांच्या या मदतीमुळे मदारी बांधवांचे घरे उभा राहणार असल्याने व सर्वांनी मदतीचा हात लावल्यामुळे सर्वांचे आभार मानले. या बैठकीसाठी वैजिनाथ पाटील, श्रीकांत लोखंडे, राजाभाऊ खरात, प्रवीण कुंभार, गोरख भाऊ, मदन पाटील, महालिंग कोरे, वैभव जमकावळे, संजय कुमार , संविधान प्रचारक गणपत कराळे, लोकाधिकार आंदोलन संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल पवार, भिमराव सुरवसे, बबलू सुरवसे, राम कुमार, रेवन कुमार, हुसैन मदारी, सलीम मदारी, सरदार मदारी आदिंसह मदारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
No comments:
Post a Comment