पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -२२सप्टेंबर
खर्डा भागातील पर्यटन दृष्ट्या विविध प्रेक्षणीय स्थळांच्या माहितीसह अनेक विषय व महत्त्वपूर्ण बातम्यांनी नटलेल्या पोलीस वारंट गणेशोत्सव विशेषांकांचे अनावरण खर्डा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सह्ययक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या हस्ते करण्यात आले .
खर्डा पोलीस स्टेशन येथे झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमाच्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्यासह पोलीस वारंटच्या संपादिका श्वेता बापूसाहेब गायकवाड ,पत्रकार धनसिंग साळुंखे, ठाणे अंमलदार संजय जायभाय, पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल शिंदे , आदी पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित होते
पोलीस वारंटच्या विविध विशेषांतून नेहमीच विविध अशा सामाजिक व समाजाच्या विविध विषयांचा आढावा व मार्गदर्शनपर विषय असतात. या विशेषांकात खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील कायदा व सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी केलेल्या कामांची उपयोजनांची माहिती कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी आपल्या मुलाखतीद्वारे या अंकात प्रकाशित केली आहे.
No comments:
Post a Comment