पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२८ सप्टेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन नव्याने रुजू झाल्याने पहिल्यांदाच पोलीस ठाण्याच्या आवारात गणपतीची स्थापना केली होती. यावर्षी बसवण्यात आलेल्या गणपतीचे दहाव्या दिवशी वाजत गाजत विसर्जन करण्यात आले आहे .गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना नाचण्याचा मोह काही आवरता आला नाही देहभान विसरून पोलीस नाचण्यात दंग झालेले बघायला मिळाले .पोलीस गाडीवर गणरायाचे मूर्ती ठेवून मिरवणूक काढण्यात आली खर्डा पोलिसांनी अगदी नाचत , गाजत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आव्हान केल आहे.
मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
शिस्तबद्ध मिरवणुकीचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. गणेश स्थापना व मिरवणूक काढण्यात आली व पोलीस बांधवांनी याचा मनसोक्त आनंद लुटला या मिरवणुकीसाठी
उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर , पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस नाईक संजय जायभाय, पोलीस कॉन्स्टेबल शेषराव मस्के , बाळू खाडे ,अशोक बडे, गणेश बडे , राहुल शिंदे, धनराज बिराजदार ,बारवकर ,विष्णू आवारे ,.शाम चकाले , पंडित हंबर्डे. वैजिनाथ मिसाळ, सोनवणे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अयोध्या पोकळे , घोगरे मॅडम व सर्व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी होते.
No comments:
Post a Comment