पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२८ सप्टेंबर
जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जामखेड पोलीस बांधवानी स्थापन केलेल्या
गणेशाचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले.
पोलीस गाडीवर गणरायाची मनमोहक मुर्ती, वाद्याचा कमी परंतु लयबद्ध सुर आणि परिसरात निर्माण झालेले भक्तीमय वातावरणात या पार्श्वभूमीवर पोलीस बांधवाना नाचण्याचा मोह काही आवरता आला नाही. अगदी देहभान विसरून पोलीस नाचण्यात दंग झालेले पाहायला मिळाले. जामखेड पोलिसांनी अगदी नाचत-गाजत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आवाहन केलं. व शिस्तबध्द मिरवणुकीचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
गणेश स्थापना व मिरवणूक काढण्यात आली व पोलीस बांधवांनी याचा मनसोक्त आनंद लुटला.
या मिरवणुकीसाठी पोलीस निरीक्षक महेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती, सहाय्यक उपनिरीक्षक यादव , हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे, अडसूळ, पोलीस नाईक अजय साठे , अविनाश ढेरे, कोपणर, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पालवे, दत्तू बेलेकर, सचिन पिरगळ, सचिन देवढे, नवनाथ शेकडे,दिनेश गंगे , योगेश दळवी ,पाचपुते, बोराटे , भागडे, कळाणे ,गव्हाणे, परदेशी ,सुपेकर, माहीला पोलीस कर्मचारी धांडे, शिंदे ,धनवडे आदींसह होमगार्ड उपस्थित होते.
No comments:
Post a Comment