पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -२८ सप्टेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर मित्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खर्डा व पत्रकार दत्तराज पवार यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . शनिवारी दि.३० रोजी खर्डा बसस्थानक या ठिकाणी सकाळी ९ वाजता ते दुपारी ३ पर्यंत रक्तदात्यांना रक्तदान करण्याची वेळ आहे. व प्रत्येक रक्तदात्यास "ब्लूटूथ एअर बड्स "दिले जाणार आहेत. अशा अनोख्या पद्धतीने खर्डा येथे उद्या रक्तदान शिबिराचे मोठे आयोजन केले आहे तसेच खर्डा परिसरातील नागरिक व आमदार रोहित दादा पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराला उपस्थित राहावे व रक्तदान करून सहकार्य करावे असे आव्हान राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment