पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२७ सप्टेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे खर्डा इंग्लिश स्कूल विद्यालय येथे आज पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. श्री. क्षेत्र सीताराम गडावर मोठ्या थाटामाटात जयंती संपन्न झाली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जामखेड चे विद्यमान आमदार आणि जनरल बॉडी सदस्य, रयत शिक्षण संस्था,सातारा,प्रमुख पाहुणे शिवाजीराव तापकीर , सहाय्यक विभागीय अधिकारी, रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग (अहमदनगर )व सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर, प्रमुख वक्ते सचिन झगडे ,युवा वक्ते महादजी शिंदे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत प्राचार्य मुस्तफा सय्यद यांनी केले.विद्यालयाचा इतिहास तथा शाखा अहवाल विद्यालयाचे पर्यवेक्षक रमेश पाटील यांनी सांगितला. प्रमुख वक्ते सचिन झगडे यांनी डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा आढावा घेऊन तसेच जगावं कसं या विषयावर उपस्थितांना उदबोधित केले.विद्यालयास खेळ साहित्य स्वरूपात देणगी देणारे किशोरशेठ कांकरिया, सचिन शहा, अविनाश शहा, सागर शहा, शिवकुमार गुळवे यांचा तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी व देणगीदार दत्तात्रय पांडकर यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजीराव तापकीर यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य व शिक्षणाचे खाजगीकरण या परिस्थितीचा आढावा घेत शिक्षणाचे महत्व त्यांनी सागितले. तसेच विद्यालयातील इयत्ता दहावी व बारावी तसेच पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा एन. एन. एम एस परीक्षेत यश मिळणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार रोख रक्कम व ट्रॉफी देवून प्रमुख पाहुणे व उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला.बक्षीस वितरण कामकाज दत्तात्रय ढाळे व श्री रवींद्र कोरे यांनी केले.सिताराम गडाच्या वतीने विध्यार्थ्यांना स्वादिष्ट जेवण देण्यात आले.
कार्यक्रमासाठी स्थानिक स्कूल कमिटीच्या सदस्या जयश्रीताई गोलेकर, किशोरशेठ कांकरिया,अशोक गिते शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण कुंभार ,सर्व सदस्य, माता पालक समिती अध्यक्ष, सर्व सदस्य, खर्डा खर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ .व्हरे , राष्ट्रवादी ज़िल्हा संघट विजयसिंह गोलेकर,चंदूशेठ गोलेकर,ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर ,माजी चेअरमन चंद्रकांत गोलेकर शेतकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष सुनील लोंढे ,डॉ. बिपीन लाड व पत्रकार, पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्ते, पालक,सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्तेश्वर फामदे व रामनाथ ढाकणे यांनी केले. तर आभार व्यक्त हनुमंत वनवे यांनी मानले.
No comments:
Post a Comment