पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२६ ऑक्टोबर
जामखेड तालुक्यातील बांधखडक येथे काल दि.२५ ऑक्टोबर रोजी बांधखडक येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय सरंक्षक भिंतीचे भूमिपूजन विद्यार्थ्यांच्या हस्ते संपन्न झाले आहे .
जामखेड तालुक्याचे कार्यक्षम गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या विशेष प्रयत्न व सहकार्यातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत मंजूर झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळचे बांधखडकच्या शालेय संरक्षक भिंतीचे भूमीपूजन शाळेतील इयत्ता १ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते काल बुधवार दि.२५ ऑक्टोबर रोजी उत्साहात संपन्न झाले.
यावेळी बांधखडक ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच राजेंद्र कुटे, उपसरपंच तान्हाजी फुंदे ,ग्रामपंचायत सदस्य पाटील, शांतीलाल मामा वारे, चेअरमन सखाराम वनवे, मुकादम अर्जुन दराडे, ग्रामसेविका श्रीम.स्वाती पटेकर मॅडम, ग्रामरोजगार सेवक धनाजी फुंदे पाटील, शिपाई कल्याण उबाळे, मुख्याध्यापक विकास सौने , सहशिक्षक मनोहर इनामदार सर यांच्यासह बांधखडक शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment