देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून दसरा व दिवाळीनिमित्त "मागेल त्याला दाळ" योजनेतंर्गत भाजप - शिवसेनेच्या वतीने राज्यातील प्रत्येक व्यक्तीला रुपये प्रति किलो दराने प्रत्येकी पाच किलो दाळ देण्यात येत असून खर्डा भाजपाच्या वतीने बसस्थानक येथे भाजपाचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष रविंद सुरवसे, सरपंच सौ. संजीवनी वैजनाथ पाटील, बाजार समीती संचालक वैजिनाथ पाटील, माजी सरपंच संजय गोपाळघरे, ग्रामपंचायत सदस्य सोपान गोपाळघरे , राजू मोरे , महेश दिंडोरे , गणेश शिंदे , गणेश लटके ,व आदी मान्यवरांच्या हस्ते दाळीचे वाटप सुरू करण्यात आले होते .
सर्वसामान्यांना डाळ स्वस्त दरात मिळावी म्हणून नाफेडच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्डच्या ओळख पत्रावर प्रति व्यक्ती ५ किलो दाळ उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही दाळ भाजप - शिवसेनेच्या सर्व कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध होणार असून नागरिकांनी आपल्या जवळच्या कार्यालयात असे आवाहन करण्यात आले आहे.
आज डाळ वाटप करण्याचा हा दुसरा टप्पा असून आज सकाळी १० वाजल्यापासून चालू झाला व ह्या डाळ वाटपला नागरिकांचा उस्तुर्फ प्रतिसाद मिळाला आहे .
डाळ खरेदीसाठी आधार कार्ड सक्तीचे असून एका कुटुंबात पाच सदस्य असतील तर प्रति व्यक्ती ५ किलो दाळ खरेदी करता येणार.असल्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे यांनी सांगितले आहे.
आवश्यक कागदपत्रेः
* आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.
* एक व्यक्तीला एका आधार कार्डवर पाच किलो चना डाळ घेता येईल.
* येताना पिशवी सोबत आणणे.
चौकट : सदर योजना स्टॉक असेपर्यंत लागु राहिल. येताना आपल्या कुटूंबामधील जास्तीत जास्त सदस्यांचे आधार कार्ड घेऊन यावे म्हणजे या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल.
No comments:
Post a Comment