पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२३ डिसेंबर
अहमदनगर जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात आज दि २३ डिसेंबर २०२३ ते ०५ जानेवारी २०२४ या कालावधीत विविध कारणांनी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता देत नाही. तसेच सण, उत्सव, उपोषण, महासभा, विविध कार्यक्रम, मोर्चे आंदोलने, जातीय संवेदनशील वातावरण इत्यादीमुळे सार्वजनिक शांतता बिघडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी संपूर्ण जिल्हात महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम ३७ (१) व ३७ (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले असुन त्या संबंधीचे आदेश जामखेड पोलीस स्टेशनला प्राप्त झाले असून तालुक्यातील नागरिकांनी या आदेशाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे .
अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आगामी सण उत्सव, उपोषण, महासभा, मोर्चा, आंदोलन, आणि विविध कार्यक्रम असल्याचे पार्श्वभूमीवर दि. आज दि २३ डिसेंबर २०२३ ते ०५ जानेवारी २०२४ असे १४ दिवसांच्या कालावधीसाठी जमावबंदी व हत्यारबंदीचे आदेश जारी केलेले आहेत. यानुसार अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश काढून जिल्हय़ातील सर्व पोलीस स्टेशनला पाठवलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत कलम ३७ (१) व ३७ (३) ये प्रतिबंधात्मक आदेश जारी करणे आवश्यक असल्याची सदर कालावधीत व ठिकाणी कोणाही इसमास खालील कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे.
(अ) शस्त्रे, काठया, सोटे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, दंडे अगर लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे,
(ब) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किवा साधने जवळ बाळगणे, तयार करणे किवा जमा करणे
(क) कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे.
(3) कोणताही दाहक पदार्थ किवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे.
(इ) जाहीरपणे घोषणा देणे, गाणे, म्हणणे, वादय वाजविणे, ध्वनिवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारा उपकरण सच वापरणे किंवा वाजवणे.
याबाबत जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी एक प्रसिद्ध पत्रक काढले असून तालुक्यातील नागरिकांनी याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन केले आहे.
चौकट
दि. १ जानेवारी रोजी माजी मंत्री आ. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन या जमाव बंदी आदेशामुळे या कार्यक्रमांना अडचण येण्याची शक्यता असुन पोलीस प्रशासनाकडून या कार्यक्रमाना परवानगी मिळेल की नाही हा मोठा प्रश्न आ. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या आयोजकांना पडला आहे.
No comments:
Post a Comment