पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२२ डिसेंबर
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज दि. २२ डिसेंबर रोजी भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद शाळा व उर्दू शाळा खर्डा शालेय साहित्य वाटप करण्यात आले
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची जयंती दिनांक १२ डिसेंबर रोजी असते त्यादिवशी जयंतीनिमित्त त्यांना जगभरात त्यांना अभिवादन करण्यात येते , त्याच पार्श्वभूमीवर आज दि २२ डिसेंबर रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा येथे भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रम घेऊन विद्यार्थी आणि गरजूंना मदतीचा हात दिला सामाजिक दायित्वाचा एक अनोखा संदेश यावेळी पहावयास मिळाला . मतदारसंघातील विद्यार्थ्यांना वह्या, पॅड आणि शालेय साहित्याचे वाटप आज करण्यात आले .
यावेळ भगवान बाबा प्रतिष्ठानच्या वतीने विध्यार्थीना सांगण्यात आले की लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे जनसामान्यांचे नेते होते त्यांनी त्यांच्या जीवनात केलेले काम व विचार त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन करून व सामाजिक उपक्रम करून पुढे घेऊन जायचे आहेत त्यांचे काम हे नेहमीच सर्वांना प्रेरणा देत राहिल . असे प्रतिपादन भगवान प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले.
यावेळी उपस्थित सरपंच संजीवनी पाटील ,ग्रामपंचायत सदस्य मदन पाटील ,महालिंग कोरे ,सोपान गोपाळघरे ,राजू मोरे ,मार्केट कमिटी संचालक वैजनाथ पाटील, उपसरपंच भागवत सुरवसे, भगवान प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरि गोपाळघरे, युवा नेते बाजीराव गोपाळघरे ,बाळासाहेब गोपाळघरे , भास्कर गोपाळघरे, नामदेव गोपाळघरे, दादा चवदार ,अनिल दराडे, बाबू केकान, रामा गीते, योगेश सुरवसे , संजय पेडगावकर, कांतीलाल डोके व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment