पोलीस वारंट न्यूज नेटवर्क- २१डिसेंबर
आमदार प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील खर्डा येथे २ जानेवारी रोजी आपल्या लावणीने तरुणाईला भुरळ घालणारी आणि नेहमी चर्चेत राहणारी 'सबसे कातील गौतमी पाटीलच्या लावणीचा जलवा आता खर्ड्यात मध्ये दिसणार आहे. येत्या २ जानेवारी २०२४ ला गौतमीचा लावणीचा कार्यक्रम होणार आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाचे भारतीय जनता पार्टी, खर्डा गट यांच्या वतीने आयोजन करण्यात आलं आहे. २ जानेवारीला मार्केट कमिटी ग्राऊंड खर्डा या मैदान परिसरात हा कार्यक्रम होणार आहे.
गौतमी पाटील सध्या आपल्या लावणीमुळे चांगली चर्चेत असते तिच्या अदाकारीची तरुणाईमध्ये मोठी क्रेज देखील आहे. प्रत्येक कार्यक्रमाला तरुणाईची मोठी गर्दी होताना दिसते , तिने आजपर्यंत केलेल्या लावणीच्या कार्यक्रमात तरुणाईने धिंगाणा घातल्याने अनेक वेळा गौतमी हिचा कार्यक्रम चर्चेचा विषय देखील ठरलेला आहे .या कार्यक्रमासाठी खर्डा व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment