पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -१ जानेवारी
आमदार राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील जिल्हा परिषद शाळा इनाम वस्ती ,बारगजे वस्ती व नागोबाचीवाडी येथे शालेय साहित्य वाटप व खाऊ वाटप भारतीय जनता पार्टी व भगवानबाबा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आमदार राम शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मतदारसंघातील विविध गावांमध्ये सामाजिक उपक्रम राबवत आ.राम शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. भाजपा कार्यकर्त्यांनी राबवलेल्या सामाजिक उपक्रमामुळे
मतदारसंघातील विद्यार्थ्यांना वह्या, पॅड आणि शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी उपस्थित नानासाहेब गोपाळघरे, ग्रामपंचायत सदस्य सोपान गोपाळघरे, बाजीराव गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, भास्कर गोपाळघरे, नामदेव गोपाळघरे, अनिल दराडे, एकनाथ गोपाळघरे, रामदास गिते, लक्ष्मण गोपाळघरे, बाबु गोपाळघरे, भिमराव गोपाळघरे, पिनु गोपाळघरे, शशिकांत गोपाळघरे, दत्तात्रय गोपाळघरे, अभिमान गिते राजु गोपाळघरे, पांडू सुरवसे व विद्यार्थी बांधव व शिक्षक वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजपा कार्यकर्त्यांकडून कर्जत-जामखेड मतदारसंघात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे गेल्या ३,४ दिवसांपासून मतदारसंघात आयोजन करण्यात आले. नववर्षाच्या पुर्वसंध्येपासूनच आ. राम शिंदे यांचा वाढदिवस मतदारसंघात मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यास सुरुवात झाली. मतदारसंघातील विविध गावांमध्ये आ. राम शिंदे यांच्या स्वागतासाठी भाजपा कार्यकर्त्यांसह सामान्य जनता एकवटल्याचे चित्र गेल्या चार दिवसांपासून निर्माण झाले आहे. आमदार राम शिंदे यांच्या झंझावाती दौर्याने गावोगावच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश संचारला आहे.
चौकट
आमदार प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डा येथे दि.२ जानेवारी रोजी आयोजित भारतीय जनता पार्टी खर्डा गट यांच्या वतीने आपल्या लावणीने तरुणाईला भुरळ घालणारी आणि नेहमी चर्चेत असणारी गौतमी पाटील हिच्या लावणीचा जलवा खर्ड्यामध्ये नागरिकांना पहावयास मिळणार आहे .
No comments:
Post a Comment