पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२ जानेवारी
माझा वाढदिवस गेली सात दिवस सुरू आहे. अशा प्रकारे जनतेचे प्रेम मिळायला सुद्धा नशीब लागत. माझ्या अडचणींच्या काळात, माझ्या दुःखाच्या काळात तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलात. मी तुमच्या प्रति मनातून श्रद्धा आणि निष्ठा ठेवून गेली अनेक वर्ष काम करत आहे.
आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो आणि तुमचं असेच प्रेम माझ्यावर माझ्या कार्यकर्त्यांवर व पदाधिकाऱ्यांवर ठेवावं. अशी मी प्रार्थना करून तुम्हाला नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो असे प्रतिपादन आमदार प्रा. राम शिंदे यांनी केले. जामखेड तालुक्यातील खर्डा येथे भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने आ. राम शिंदें यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य असा सत्कार सोहळा पार पडला
यावेळी फेमस रिल्स स्टार हिंदवी पाटील ह्या प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित होत्या.त्यांच्या नृत्याने खर्डेकरांचे मन जिंकली , यावेळी आमदार राम शिंदे हे स्टेज वरती न बसता त्यांनी कार्यकर्ते व जनेतेसोबत खाली बसून कार्यक्रमाचा आनंद घेतला , यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी उपस्थितीत भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद, सभापती शरद कार्ले, मा. पं.स. सदस्य कांतीलाल खिवंसरा, बाजार समिती संचालक वैजीनाथ पाटील, माजी सरपंच संजय गोपाळघरे , नगरसेवक अमित चिंतामनी ,शहराध्यक्ष बिभीषण धनवडे , युवा नेते नितीन सुरवसे ,दत्तात्रय चिंचकर, ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे, महेश दिंडोरे, राजू मोरे , सोपान गोपाळघरे , पांडुरंग उबाळे, तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी व आ.राम शिंदे यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नागरिकांचीही मोठी गर्दी पाहायला मिळाली.
यावेळी मोठी गर्दी झाल्याने खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने मोठ्या जल्लोष पुर्ण घोषणा, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
No comments:
Post a Comment