पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -२ जानेवारी
भाजपा नेते, माजीमंत्री आ. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत-जामखेड मतदारसंघात अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गतच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले व उद्योजक राजेंद्र देशपांडे यांच्या वतीने जवळा जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले आहे.
काल दि. १ जानेवारी रोजी आ. प्रा.राम शिंदे यांचा वाढदिवस संपुर्ण कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात मोठय़ा उत्साहात साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने अनेक ठिकाणी सांस्कृतिक, सामाजिक व लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले व उद्योगपती राजेंद्र देशपांडे यांच्या वतीने कुसडगाव, जवळा, हाळगाव, आरणगाव, डोणगाव, पिंपरखेड, रत्नापुर, पाटोदा, चौंडी, कवडगाव, आघी, धानोरा, धोंडपारगाव, राजेवाडी, झिक्री, डिसलेवाडी, बावी, सांगवी, खामगाव, भोयकरवाडी, फक्राबाद, डोणगाव, भवरवाडी व
खांडवीसह जवळा जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. या शालेय साहित्य वाटप प्रसंगी विविध ठिकाणी विविध पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment