कर्जत-जामखेडमध्ये महिलांसाठी मोठा प्रोजेक्ट आणणार - आमदार प्रा.राम शिंदे - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

मंगळवार, २ जानेवारी, २०२४

Home राजकीय बातम्या कर्जत-जामखेडमध्ये महिलांसाठी मोठा प्रोजेक्ट आणणार - आमदार प्रा.राम शिंदे

कर्जत-जामखेडमध्ये महिलांसाठी मोठा प्रोजेक्ट आणणार - आमदार प्रा.राम शिंदे

मंगळवार, जानेवारी ०२, २०२४ राजकीय बातम्या,

पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२ जानेवारी

मी 15 वर्षांपासून आमदार आहे. मंत्री झालो. माझ्या अनेकदा खूप मोठ्या सभा झाल्या पण कधीच आजच्या एवढ्या महिला माझ्या सभेला जमल्या नाहीत. पण गेल्या वर्षी व यावर्षी नान्नजमध्ये प्रचंड संख्येने महिला जमल्या आहेत. आज झालेली प्रचंड गर्दी ही मनिषाताईंची किमया आहे. मनिषाताईंनी भाषण करताना सांगितलं की, आम्ही तुम्हाला काहीच मागणार नाही. पण मी तुम्हाला विश्वास देतो की, फक्त महिलांसाठीच या कर्जत जामखेडमध्ये असा प्रोजेक्ट आणेन की, संपूर्ण कर्जत-जामखेडमधील महिलांना मानाचं स्थान त्याच्यामधून मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत आमदार राम शिंदे यांनी महिलांसाठी मतदारसंघात मोठा प्रोजेक्ट आणणार असल्याचा संकल्प नववर्षाच्या प्रारंभी केला. 

राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले प्रभाग संघाच्या वतीने 18 ग्राम संघांना 2 कोटी 11 लाख रूपये कर्जाचे वाटप करण्यात आले. आमदार प्रा.राम शिंदे व त्यांच्या पत्नी जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई शिंदे यांच्या हस्ते कर्ज वाटप करण्यात आले. सावित्रीबाई फुले प्रभाग संघाच्या सीपीसी मनिषाताई मोहळकर यांच्या पुढाकारातून व जालिंदर चव्हाण यांच्या विशेष सहकार्यातून जामखेड तालुक्यातील नान्नज येथे 1 जानेवारी 2024 रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार प्रा. राम शिंदे बोलत होते.

यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात बचत गटातील महिला सदस्यांच्या शेकडो लहान मुला-मुलींची मोफत आरोग्य तपासणी व आहार मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी ओम हॉस्पिटलने सहकार्य केले. त्याबरोबर महिला बचत गटांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच ज्योती क्रांती मल्टिस्टेट बँक योजना मार्गदर्शन त्याचबरोबर कांदा उद्योग प्रक्रिया मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी हजारो महिलांच्या उपस्थितीत आमदार प्रा.राम शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तत्पूर्वी माजी सभापती आशाताई शिंदे यांनी उपस्थित महिलांशी दिलखुलास संवाद साधला. त्यांनी उपस्थित महिलांची मने जिंकली. 

पुढे बोलताना आमदार प्रा.राम शिंदे म्हणाले की, ज्या दिवशी माझ्या हातात आणि पेनात सत्ता येईल त्या दिवशी मी महिलांच्या संदर्भामध्ये कर्जत जामखेडमध्ये निर्णय घेतल्याशिवाय राहणार आहे. निर्णय घेऊन महिलांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणल्याशिवाय राहणार नाही, मी जलसंधारण मंत्री होतो तेव्हा मतदारसंघात जलयुक्त शिवार योजना राबवली. त्यामुळे मतदारसंघात कुठेही गेल्या पाच वर्षांत टँकर लागला नाही. महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरला. आता गावोगावी जलजीवन योजनेचे काम सुरू आहे. लवकरच या योजनेतून घरोघरी शुध्द पाण्याचा पुरवठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे महिलांची उद्योग व्यवसायात प्रगती होताना दिसत आहे. समाजात व कुटूंबात महिलांचा सन्मान वाढू लागलाय. बचत गटांच्या माध्यमांतून महिलांचे संघटन मजबूत होत आहे ही अभिमानास्पद बाब आहे, असे शिंदे म्हणाले. 

यावेळी जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई शिंदे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, तालुका कृषि अधिकारी राजेंद्र सुपेकर, रमेश धोत्रे, हरीबा चांदगावे, प्रभागसंघाच्या अध्यक्ष रेणुका बोराटे, सचिव सारिका भोसले, अर्चना निगडे, दिपाली बांदल, पुजा सुतार, छाया कापसे, मालन कचरे, शुभांगी वाघमारे, रूक्साना शेख, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, बाजार समिती सभापती शरद कार्ले, माजी सभापती डाॅ भगवान मुरुमकर, पांडुरंग उबाळे, लहू शिंदे, बापुराव ढवळे, प्रशांत शिंदे, अजिनाथ हजारे, सुनिल हजारे, अमित चिंतामणी सोमनाथ पाचरणे, डाॅ गणेश जगताप, तुषार पवार, उदय पवार, बिभीषण धनवडे, सरपंच सुशिल आव्हाड, सह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिषाताई मोहळकर यांनी केले तर सूत्रसंचालन निकम महाराज यांनी केले.
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at मंगळवार, जानेवारी ०२, २०२४
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • मोठी बातमी: अवैध वसुलीचा व्हिडीओ व्हायरल; शेंडी बायपासवर ट्रकचालकांकडून पैसे घेताना पोलीस निलंबित
    अहिल्यानगर (दि. ११ सप्टेंबर) –  आहिल्यानगरमधिल शेंडी बायपास परिसरात ट्रकचालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या प्रकरणाचा व्ह...
  • धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनिधी/१८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवा...
  • जामखेड बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह सापडला, संजय कोठारी यांनी पोलिसांना दिली माहिती ,परिसरात खळबळ
    जामखेड प्रतिनधी/8सप्टेंबर2025 जामखेड येथील बसस्थानकावरील शेडमध्ये एका अंदाजे ७५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले प...
  • ब्रेकिंग न्यूज : अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणलेखर्डा हद्दीत स्थानीक गुन्हे शाखेचा छापा, तिरट जुगार अड्ड्यांवर ४० जण ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त
    खर्डा प्रतिनधी/सप्टेंबर2025 अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवा...
  • ५ लाख रुपयांच्या बनावट नोकरी फसवणुकीचा खर्डा पोलिसांकडून पर्दाफाश;२ वर्षे फरार आरोपी मुरलीधर नेटके नवी मुंबईतून अटक
    खर्डा प्रतिनधी/१७सप्टेंबर२०२५ खर्डा पोलीसांनी नोकरीचे आमिष दाखवून ५ लाख रुपयांची फसवणूक करणा-या फरार आरोपी मुरलीधर धर्मा नेटके र...
  • अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गावातून अपहरण करून पनवेलला नेले, मुख्य आरोपी अटकेत! परिसरात खळबळ!
    जामखेड प्रतिनिधी / ५ ऑक्टोबर २०२५ आष्टी तालुक्यातील एका गावातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने चारचाकी वाहनातून उचलून तिच...

Popular Posts

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

मोठी बातमी :स्थानिक गुन्हे शाखेचे धडाकेबाज कामगिरी! जामखेडमध्ये गोळीबार करणारे 6 आरोपी 24 तासाचे आत जेरबंद

निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले पोलीस सेवेतून बडतर्फ

जामखेड: पाळीव जनावरे नागरिकांनी मोकाट सोडू नये अन्यथा नगरपरिषदेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार - मुख्याधिकारी अजय साळवे

जामखेडमध्ये शांतता सुरक्षिततेसाठी श्री नागेश्वर यात्रेपूर्वी शांतता समिती बैठक संपन्न

जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पालकमंत्र्यांचा दणका: निर्भयपणे अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू करा- राधाकृष्ण विखे पाटील

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *