कर्जत-जामखेड मतदारसंघात वीज वितरणाचे जाळे होणार मजबूत; आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

शुक्रवार, १२ जानेवारी, २०२४

Home राजकीय बातम्या कर्जत-जामखेड मतदारसंघात वीज वितरणाचे जाळे होणार मजबूत; आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश

कर्जत-जामखेड मतदारसंघात वीज वितरणाचे जाळे होणार मजबूत; आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश

शुक्रवार, जानेवारी १२, २०२४ राजकीय बातम्या,


पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१२ जानेवारी

 कर्जत-जामखेड मतदारसंघात वीज वितरण यंत्रणा अधिक मजबूत करण्याच्या आमदार रोहित पवार यांच्या आणखी एका प्रयत्नाला यश आले आहे. मतदारसंघात तीन नवीन उपकेंद्रांना मंजुरी मिळाली असून पाच उपकेंद्रांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. शिवाय कर्जत विभाग मध्ये ३३४ कि.मी. ची केबल लाईन आणि ६५ कि.मी.ची लिंक लाईनही मंजूर झाली आहे.

वीज, रस्ते ही विकासाची मानके समजली जातात, किंबहुना यावरूनच विकास मोजला जातो. त्यामुळे वीज आणि रस्त्यांसह इतरही पायाभूत सुविधा निर्माण करण्याकडे आमदार रोहित पवार यांनी जातीने लक्ष दिले. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आणि मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षांत वीज यंत्रणेचे मजबुतीकरण केले. आता पुन्हा नव्याने महावितरणच्या आरडीएसएस योजनेअंतर्गत मतदारसंघात चौंडी, चिलवडी आणि जळगाव या तीन नवीन उपकेंद्रांना मंजुरी आणली असून कुळधरण, मिरजगाव, भांबोरा, खांडवी आणि भानगाव या उपकेंद्रांचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी नायगाव, घुमरी आणि दिघोळ हे उपकेंद्र आमदार रोहित पवार यांनी मंजूर करुन आणले असून त्यापैकी नायगाव आणि घुमरी या उपकेंद्रांचे लोकार्पण झाले आहे तर दिघोळ उपकेंद्राचे काम हे पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. तर कर्जत येथील वीज उपकेंद्रांच्या विस्तारीकरणाचेही काम करण्यात आले आहे.

याशिवाय गळती व वीज हानी रोखण्यासाठी कर्जत विभागात ३३४ कि.मी.ची एबी केबल टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. यामध्ये खर्डा, आनंदवाडी, राजुरी, सारोळा, जामखेड, तरडगाव, कर्जत, चापडगाव, मिरजगाव, बेलगाव, जुनी कोंभळी, जुने मलठण, नवी कोंभळी, नवीन मलठण, कुळधरण, शिंदा, पिंपळवाडी, कोपर्डी, नांदगाव, येसवडी, खांडवी, दूरगाव, भोसे, धालवडी, थेरगाव, चांदा, मुळेवाडी, थेरवडी, हनुमाननगर, जामदरवाडा, राक्षसवाडी, नाथाचीवाडी, टाकळी खु, चांदगाव, राजुरी, पाडळी, अरणगाव, निमगाव गांगर्डा, मांदळी, बेलवंडी या गावांचा समावेश आहे. तसेच कर्जत विभागात ६५ कि.मी.ची लिंक लाईनही मंजूर झाली असून त्याचा फायदा कोंभळी, चांदे, जामखेड, अरणगाव, खांडवी, कर्जत, नांदगाव आणि राशीन-येसवडी या गावांना होणार आहे.
या सर्व कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन ही कामे सुरु करण्यात आल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी सांगितली. 

कृषी आकस्मितता निधीतून (एसीएफ) घुमरी उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून दिघोळ उपकेद्रांचेही काम लवकरच सुरु होणार आहे आणि राशीन उपकेंद्राच्या विस्तारीकरणाचेही काम पूर्ण झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना अखंडीत आणि पुरेशा दाबाने वीज पुरवठा होण्यास मदत होणार आहे.

प्रतिक्रिया : 

कर्जत-जामखेड मतदारसंघात वीज पुरवठ्याबाबत पहिल्यापासून सर्वांच्याच मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. शेतकऱ्यांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांनाचा याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे मतदारसंघातील हा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्याच्यादृष्टीने पहिल्यापासून प्रयत्न करुन राज्य शासनाकडून त्यासाठी पुरेसा निधी मंजूर करुन आणला. त्यामुळे मतदारसंघातील वीजपुरवठ्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली, याचं लोकप्रतिनिधी म्हणून समाधान आहे.
- रोहित पवार
(आमदार, कर्जत-जामखेड)
---------
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at शुक्रवार, जानेवारी १२, २०२४
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

Popular Posts

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *