पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१३ जानेवारी
जामखेड शहरातील सदाफुलेवस्ती येथील अश्विनी आण्णा नेमाने (वय १७) या अकरावीत शिकणाऱ्या मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना काल दि. १२ जानेवारी रोजी घडली आहे. सविस्तर असे की, सदाफुले वस्ती येथे राहणारी अश्विनी नेमाने हि शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत होती. आई वडील एका वीटभट्टीवर कामाला असतात. काल दि. १२ जानेवारी रोजी सकाळी दोघेही कामाला गेले होते. मयत अश्विनी ही कॉलेजला गेली होती. कॉलेज सुटल्यावर अश्विनीने घरी येऊन घरातील घरकाम केले व नंतर घरातील पत्र्याच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी आई वडील घरी आल्यावर ही घटना लक्षात आली तेव्हा ताबडतोब त्यानी अश्विनीला ग्रामीण रुग्णालय दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी ती मयत झाली असल्याचे सांगितले. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. घटना समजताच पोलीस निरीक्षक महेश पाटील घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment