पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -१६ जानेवारी
खासदार सुजय विखे व आमदार राम शिंदे यांच्या प्रयत्नातुन खर्डा व परिसरातील वाड्या वस्त्यांकरिता निधी आणून विविध विकास कामे मंजूर केली आहेत. तसेच जामखेड तालुक्यातील खर्डा येथील १८ कोटी ४५.४९ लक्ष किमतीच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती आमदार राम शिंदे असणार आहेत ,उध्या दि. १७ जानेवारी रोजी सीताराम गड खर्डा येथे सकाळी ८.३० वाजता भूमीपूजन सोहळा व उद्घाटन समारंभ होणार असून तरी खर्डा व पंचक्रोशीतील सरपंच , उपसरपंच ,चेअरमन , व्हाईस चेअरमन व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ खर्डा यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.
कर्जत -जामखेड मतदारसंघातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी वैयक्तिक पातळीवर लक्ष घालून शासन दरबारी जोरदार पाठपुरावा हाती घेतला आहे. मतदारसंघासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांनी कोट्यावधी रूपयांचा निधी मंजुर करून आणला आहे, तसेच स्थानिक विकास निधीतून कोट्यावधी रूपयांची कामे प्रस्तावित केली आहेत, यामुळे मतदारसंघात आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून विकासाचा नवा झंझावात निर्माण झाला आहे. यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण पसरले आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी टीका टिप्पणीचे राजकारण न करता विकासाच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे विरोधकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
*विविध मंजूर कामे* -
१. जल जीवन मिशन (एम.जी.पी) १७ कोटी
२.दलित वस्ती अंतर्गत मातंग वस्ती एल. ए. डी दिवे बसवणे ३.५० लक्ष
३.दलित वस्ती अंतर्गत चांभार वस्ती एल. ए. डी दिवे बसवणे ७.५० लक्ष
४. दलित वस्ती अंतर्गत दरडवाडी येथे एल. ए. डी दिवे बसवणे ५ लक्ष
५. ३०५४ अंतर्गत खर्चा मुंगेवाडी रस्ता ते नागोबाचीवाडी मजबुती करण व डांबरीकरण २५ लक्ष
६. नागरी सुविधे अंतर्गत खर्डा गावांतर्गत रस्ता करणे ९.२५ लक्ष
७. नागरी सुविधे अंतर्गत नागरी सुविधा पुरविणे २० लक्ष
८. अंगणवाडी अंतर्गत गवळवाडी (खां) अंगणवाडी बांधकाम करणे ९.९९ लक्ष
९. क वर्ग तिर्थक्षेत्र अंतर्गत संत गितेवावा देवस्थान परिसर सुशोभीकरण करणे - १० लक्ष
१०. डिजीटल क्लासरूम अंतर्गत जि. प. शाळा खां ३ लक्ष
११. ५०५४ अंतर्गत रामा ५७ ते खडाँ गितेवस्ती, नागोवाचीवाडी ते जिल्हा हद्द इजिमा १५९ रस्ता करणे ३० स्वास
१२. नागरी सुविधा अंतर्गत जुनी ग्रा. पं. ते रामनाथ वाल्हे दुकान पर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करणे ८ लक्ष
१३. नागरी सुविधा अंतर्गत तांबोळी चौक ते चावणे दुकान पर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करणे ८ लक्ष
No comments:
Post a Comment