पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-३१ जानेवारी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली व १७ सदस्य असणारी खर्डा ग्रामपंचायत असून याठिकाणी ग्रामपंचायत परिसरात बेशिस्त वाहन पार्किंग ने नागरिक त्रस्त झाले असून ग्रामपंचायतमध्ये जानेकरिता कसरत करून जावे लागत आहे .ग्रामपंचायतीच्या आतमध्ये जाणारा जो मेन रस्ता आहे त्याच रस्त्याने भले मोठे असतंव्यस्त , बेशिस्तपणे टू व्हीलर लावल्या जातात , त्यामुळे खर्डा व परिसरातील ग्रामपंचायतमध्ये कामाकरिता येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसाठी डोके दुःखीच झाली असल्याचे दिसत आहे. या संबंधित काही महिन्यांपूर्वीच पोलीस वारंट वृत्तपत्रात बातमी देखील प्रसिद्ध केली होती, तरीही काही दिवसच शिस्तीचे पालन करून नंतर जैसे थेच बेशिस्त वाहन पार्किंग झाले आहे . याचा सर्वसामान्यांना नागरिकांना महिलांना त्रास होत असुन याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
चौकट
या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयात खर्डा व पंचक्रोशीतील नागरिक रोज कामानिमित्त येत असतात ,नागरिकांनी बेशिस्त केलेल्या वाहन पार्किंगमुळे सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे .तरी प्रशासनाने या बेशिस्त वाहन पार्किंगला शिस्त लावून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची व वाहन धारकांची या समस्येतून सुटका करावी.
No comments:
Post a Comment