पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२६ जानेवारी
पत्रकार आणि पोलीस हे एका नाण्याच्या दोन बाजू असतात . जेव्हा तुमच्या बातम्या येतात तेव्हा लोकांमध्ये जनजागृती होते .पत्रकारांच्या बातम्या मी रोज वाचत असतो . जनेतला व मला देखील बातमी आल्यानंतर विश्वास दर्शक वाटते पत्रकारांच्या आदरयुक्त दबावामुळे प्रशासन चांगलं काम करू शकते .असे प्रतिपादन खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी व्यक्त केले
आज दि.२६ जानेवारी रोजी खर्डा पोलीस स्टेशनचे सह्ययक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांची बदली नगर जिल्ह्यातील कोतावली पोलीस स्टेशन येथे झाली असून त्यांचा आज खर्डा पत्रकारांच्या वतीने त्यांचा सन्मानपूर्वक निरोप समारंभ करण्यात आला.
यावेळी पत्रकार संतोष थोरात, श्वेता गायकवाड , दत्तराज पवार, बाळासाहेब शिंदे ,आशुतोष गायकवाड, धनसिंग साळुंखे, अनिल धोत्रे, शेखर देशमुख, ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते , तलाठी कुलकर्णी इत्यादी उपस्थित होते
यावेळी पत्रकार बाळासाहेब शिंदे , श्वेता गायकवाड, संतोष थोरात, दत्तराज पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
No comments:
Post a Comment