पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-३१ जानेवारी
खर्डा व परिसरातील पत्रकार, व कायद्याचा सन्मान करणाऱ्या नागरिकांना सोबत घेऊन कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम करणार असल्याचे सुतोवाच खर्डा पोलीस स्टेशन येथे नव्याने आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड़ यांनी व्यक्त केले.
खर्डा स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्याबरोबर कायदा सुव्यवस्थेचा बाबतीत यशस्वी ठरलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांची नगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशनला झालेल्या बदलीनंतर खर्डा पोलीस स्टेशनचा नव्याने पदभार स्वीकारलेले सह्ययक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांचे विविध पक्षसंघटना व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून विविध प्रकारे स्वागत व सत्कार केले जात आहेत.
याच अनुषंगाने पोलीस वारंट न्यूज नेटवर्कच्या संपादिका श्वेता गायकवाड व पत्रकार धनसिंग साळुंखे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड़ यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की,मी २०१७ साली हडपसर पोलीस स्टेशन येथे क्राईम ब्रॅंचला काम केले असून याठिकाणी गुन्हेगारी वर वचक ठेवण्याचे व जास्तीत जास्त गुन्हे दाखल काम करण्याचे काम करण्याचे त्यांनी यावेळी भूमिका स्पष्ट केली. खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील विविध माध्यमांचे पत्रकार, व कायद्याचा सन्मान करणाऱ्या सर्वच समाज घटकातील नागरिकांना सोबत घेऊन आपल्याला कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम करायचे आहे. असे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी यावेळी सांगितले
No comments:
Post a Comment