पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२३ फेब्रुवारी
दि.१९ फेब्रुवारी रोजी आमदार रोहित पवार यांचा खर्डा येथे दौरा होता त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी खर्डा पोलीस स्टेशन येथे सदिच्छा भेट दिली होती तेंव्हा त्यांनी वाढत्या गुन्ह्याबद्दल चर्चा केली व त्यादरम्यान सामाजिक राजकीय नेत्यावर देखील टीका केली होती .
त्याच पार्श्वभूमीवर आज दि.२३ फेब्रुवारी रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील सोनेगावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते सचिन गायवळ यांनी रोहित पवारांचे नाव न घेता सोशल मीडियाच्या माध्यमातून पलटवार केल्याचे दिसून येत आहे. सचिन गायवळ म्हणले की , जेव्हा योद्धा शरण जात नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जातं" सामजिक कार्यकर्ते सचिन गायवळ यांची ही पोस्ट सर्वच सोशल मीडिया वर चांगलीच झळकताना दिसत आहे. चर्चेचा विषय बनली आहे .
चौकट
प्रा. सचिन सर गायवळ हे खर्डा जिल्हा परिषद गटातील खमके इच्छुक उमेदवार म्हणून ओळखले जातात . तसेच खर्डा व परिसरातील सर्वसामान्य जनेतच्या हितासाठी , नागिरकांचे , युवकांचे , प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. त्यामुळे खर्डा व परिसरातील यवूकांचे ते प्रेरणास्थान म्हणून ओळखले जातात.
No comments:
Post a Comment