पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२ फेब्रुवारी
जामखेड येथील युवा नेते पवन राळेभात यांची भारतीय जनता पक्षाच्या जामखेड शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली असून तालुकाध्यक्ष अजय काशिद यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.
जामखेड ग्रामपंचायत माजी सरपंच महादेव (आप्पा) राळेभात यांचे चिरंजीव व युवा नेते पवन राळेभात यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यासह नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार प्रा. राम शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत भारतीय जनता पक्षामधे जाहिर प्रवेश केला आहे. या प्रवेशाने जामखेडच्या राष्ट्रवादीला खिंडार तर 'भाजपाला बळ मिळाले असल्याचे बोलले जात असतानाच जामखेड भाजपाने त्यांच्यावर शहराध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी टाकली आहे. आगामी
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाने जामखेडच्या राजकारणात भाजपाला चांगलेच बळ मिळाले आहे.
युवा नेते पवन राळेभात यांना जामखेड शहराध्यक्षपदाच्या पत्र देताना भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, विभीषण धनवडे, प्रवीण चोरडिया सोमनाथ राळेभात, अॅड. प्रविण सानप, लहु शिंदे, नंदकुमार गोरे सोमनाथ पाचारणे, गणेश जगताप, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, विष्णु गंभीरे आदी मान्यवर उपस्थित होते.
तर निवडीबद्दल आ. राम शिंदे, माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, बापुराव ढवळे, सचिन पोठरे,, प्रशांत शिंदे, सरपंच सुशील आव्हाड, संपत राळेभात, मोहन गडदे (मामा) अर्चना राळेभात, संजिवनी पाटील, गौतम उतेकर, तात्याराम पोकळे, महारुद्र महारनवर, उद्धव हुलगुंडे, बाजीराव गोपाळघरे, नानासाहेब गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, जाकीर शेख, डॉ. विठ्ठल राळेभात यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी बोलताना पवनराजे राळेभात म्हणाले की, माझे वडील कै. महादेव अप्पा राळेभात यांनी शिवसेना तालुकाप्रमुख म्हणून काम करत असताना त्याचा भाजपा आणि शिवसेनेचा हिंदुत्वाचा एकच विचार होता. त्यांनी जामखेड तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून हिंदुत्वाचा विचार रूजवला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने देशात हिंदुत्वाचा मुद्दा टिकवून ठेवला आहे. तसेच कोणत्याही जाती धर्माचा तिरस्कार न करता सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन जाण्याचे विचार मला दिले आहेत. त्याचा आदर्श घेऊन येणाऱ्या काळात प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड शहराच्या विकासासाठी संघटन वाढीसाठी काम करणार आहे.
यावेळी पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक राहुन आपण निष्ठेने पक्षाचे कार्य सामान्य माणसापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न कराल असा विश्वास व्यक्त करत तालुकाध्यक्ष अजय काशिद यांनी पवन राळेभात यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment