पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२० मार्च
लोकसभा निवडणूक २०२४ चे कालावधीमध्ये उमेदवारांचे प्रचारादरम्यान सोशल मीडियाद्वारे बदनामी करणे, अफवा पसरविणे , द्वेषपूर्ण संदेश ,खोटे संदेश, तसेच प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया द्वारे प्रसारित होणाऱ्या फेक न्यूज प्रसारित करणे कायद्याने गुन्हा असून अशा प्रकारचे संदेश व अफवा पसरून दोन समाजात गटात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन अहमदनगर यांचे कडून सोशल मीडियावर वॉच राहणार असून अफवा पसरविणारे विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर सायबर पोलिसांकडून प्रसारमाध्यमाद्वारे नागरिकांना देण्यात आली आहे .
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाली आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर प्रतिबंधक कारवाया करण्यात येत आहेत.
चौकट
लोकसभा निवडणूक २०२४ शांततेत पार पाडण्यासाठी अहमदनगर जिल्हा पोलीस दलाकडून सर्व नागरिकांना आव्हान करण्यात आले आहे की अशाप्रकारे सोशल मीडियाद्वारे बदनामी करणे ,अफवा पसरविणे, खोटे संदेश, तसेच प्रिंट मीडिया ,इलेक्ट्रॉनिक मीडिया व सोशल मीडियाद्वारे प्रसारित होणारे फेक न्युज संदर्भात तक्रार देण्याकरिता अहमदनगर जिल्हा पोलीस दलाकडून 91 56 43 80 88 हा मोबाईल क्रमांक प्रसारित करण्यात येत आहे. सदरच्या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअप सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. तरी नागरिकांनी आपल्यावरील तक्रारी नमूद मोबाईल क्रमांकावर कराव्यात प्राप्त तक्रारीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment