पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२१ मार्च
जामखेड तालुक्यातील जि.प.प्राथ.शाळा पिंपळगाव उंडा येथील शिक्षिका सारिका निमसे/सस्ते मॅडम यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग 2022 परीक्षेत वर्ग 2 पदी निवड झाली. जि. प.प्राथ.शाळा चुंबळी येथील शिक्षिका उज्वला वारे/भोसले मॅडम व ल.ना.होशिंग विद्यालयाचे शिक्षक युवराज भोसले मॅडम यांची कन्या श्रेयशी युवराज भोसले इ.6 वी ज्युनिअर आय.ए.एस. परीक्षा 2024 मध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला, जि.प.प्राथ.शाळा तपनेश्वर येथील शिक्षक प्रताप पवार सर व शिक्षिका शुभांगी साळुंके/ पवार मॅडम यांचे चिं. शौर्य प्रताप पवार याने इ.7 वी ज्युनिअर आय.ए.एस.2024 मध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावला, जि.प.प्राथ.शाळा इनामवस्ती शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर कौले सर यांचे चिं. अलोक ज्ञानेश्वर कौले इ.4 थी ज्युनिअर आय.ए. एस परीक्षा 2024 मध्ये राज्यात 4 था क्रमांक पटकावला जि.प.प्राथ.शाळा भोगलवाडीचे शिक्षक संदिप गायकवाड सर यांची कन्या स्वरा संदिप गायकवाड इ.4थी हिने ज्युनिअर आय.ए.एस. परीक्षा2024 मध्ये राज्यात सातवा क्रमांक पटकावला.
या सर्वांचे कौतुक, अभिनंदन आणि शुभेच्छा देताना जामखेड तालुका गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे म्हणाले की माझा शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र कार्य प्रमाणिकपणे करत आहे. म्हणजेच फुलांचा सुगंध वाटण्याचे काम करत आहे. त्यामुळे त्यांच्या हातालाही फुलांचा सुगंध लागणारच आणि तो लागला. हे यश जरी त्यांचे असले तरी जामखेड तालुक्यातील शिक्षकांची मान सन्मानाने उंचावण्याचे काम त्यामुळे झाले आहे. याचा जामखेड तालुका गटशिक्षणाधिकारी म्हणून मला अभिमान आहे.
गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनीही श्रेयशी चे अभिनंदन करून जामखेड तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे सांगून तालूक्यात असे अनेक विद्यार्थी घडावेत अशी अपेक्षा व्यक्त केली .
केंद्रप्रमुख केशव गायकवाड यावेळी बोलतांना म्हणाले की, धनवे साहेब आमचे सेनापती आहेत.सेनापतीची कौतुकाची थाप आमच्या सर्वांसाठी उर्जा देते. त्यामुळे यशापाठोपाठ यश मिळताना दिसत आहे.विस्तार अधिकारी जाधव, नरवडे, केंद्रप्रमुख सुरेश मोहिते, केशव गायकवाड,त्रिंबके, राम निकम, विक्रम बडे, नवनाथ बडे या सर्वांनी निमसे मॅडम व श्रेयशी,शौर्य, अलोक,स्वरा या सर्वांना शुभेच्छा दिल्या.एकूणच जामखेड शिक्षण विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
No comments:
Post a Comment