पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/30 मार्च
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी काल शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.
आता ते अहमदनगर लोकसभा निवडणुकीत भाजपाचे सुजय विखेंच्या विरूद्ध लढणार आहेत. लंके परत आले, आता आणखी अनेकजण आमच्या संपर्कात आहेत, हा तर ट्रेलर, पिक्चर अजून बाकी आहे, असे वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केले आहे. ते बारामतीमध्ये प्रचार सभेत बोलत होते.
रोहित पवार म्हणाले, निलेश लंके आता आपले नगरचे उमेदवार असणार आहेत. काल त्यांनी राजीनामा दिला. त्यांचे मन तिकडे रमत नव्हते. ते लोकांशी बोलले आणि त्यांनी मत बनवले. लोकांनी सांगितले की लोक शरद पवारसाहेबांसोबत आहोत.
हा तर फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है. अनेक आमदार आमच्या आणि शरद पवार साहेबांच्या संपर्कात आहेत. अनेकजण परत येण्यासाठी इच्छुक आहेत, असे रोहित पवार म्हणाले.
No comments:
Post a Comment