पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२५ जुलै
जामखेड तालुक्यातील जवळा गावचे ग्रामदैवत जवळेश्वर महाराज रथ यात्रा उत्सव अतिशय जल्लोषात व भक्तिमय वातावरणात पार पडले.यात्रे निम्मित दर वर्षी प्रमाणे गावामध्ये भव्य कुस्ती मैदान भरवले जाते.समस्त गावकाऱ्यांच्या सहकार्याने यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मैदान भरवले जाते.या साठी कर्जत जामखेड चे आमदार रोहित पावर यांनी मोलाचे सहकार्य केले तसेच विधान परिषदेचे आमदार माजी मंत्री राम शिंदेनी मैदानासाठी सहकार्य केले.या कुस्ती मैदाना साठी जामखेड,करमाळा,परांडा,कर्जत,श्रीगोंदा तसेच विविध तालुक्यातील व जिल्ह्यातील मल्लानी आपली ताकत आजमावली.कुस्ती मैदाना साठी प्रमुख उपस्थिती मध्ये नामवंत पैलवान अर्जुन वीर पुरस्कार,२०१८ राष्टकुल क्रीडा स्पर्धेचे विजेते राहुल आवारे यांचे वडील बाळासाहेब आवारे उपस्तीत होते,त्यांच्या मागदर्शनाखाली नामवंत मल्लांच्या मोठया कुस्त्या घेतल्या त्यामध्ये ग्रीको महाराष्ट चॅम्पियन संकेत हजारे हे या मैदानासाठ उपस्थित होते.तसेच बाबा महारणावर यांच्या तालमीतीत मान अभिमान केसरी पदक विजेते पै. रोहित आव्हाड आणि गुटाळ पैलवान यांच्यामध्ये अतिशय चुरशीची अंतिम कुस्ती झाली. कुस्ती बराच वेळ सुरू होती म्हणून कुस्ती बरोबरीत सोडवण्यात अली.मल्लाना प्रोत्साहना साठी कुस्ती शौकिनांनी बक्षिसे देत त्यांचे कौतुक केले .हागाम्यांसाठी बाबा वस्ताद महारणावर ,राजू भाई वस्ताद,शकील शेख ,जमाल शेख,संजय आव्हाड यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली या वेळी सरपंच सुशील आव्हाड,उपसरपंच प्रशांत शिंदे,ज्योति क्रांति मल्टिस्टेट पतसंस्थेचे चेयरमन अजिनाथ हजारे,ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील,ग्रामपंचायत सदस्य प्रेम आव्हाड,डॉ.दीपक वाळुंजकर,बाळासाहेब आव्हाड,राजू महाजन,ग्रामपंचायत सदस्य रफिक शेख,अजित लेकुरवाळे,ग्राप. स नितीन कोल्हे,संतराम सुळ,नय्युम शेख आदी मान्यवर हागाम्यांचा आस्वाद घेतला व प्रोत्साहन देत कौतुक केले.
No comments:
Post a Comment