पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२५ जुलै
जामखेड तालुक्यातील साकतला गेल्या पंधरा दिवसापासून संततधार पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यामुळे शेतातील पिकांना मोठा फटका बसला आहे. साकतला संततधार पावसामुळे सोयाबीन, उडीद व मूग पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन पिवळे पडले असून त्याची वाढही खुंटली आहे.
साकत परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे नद्या नाल्या तुडुंब भरले आहेत गेल्या पंधरा दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नसल्याने पिकांना उन्हाचीही आवश्यकता असते मात्र पंधरा दिवसांपासून ऊन नसल्याने पिकांना पिवळेपण आले आहे.
खतांचे व बियाणांची वाढत्या किमतीचे भाव तसेच वाढती महागाई ला सामोरे जाऊन खतांचे, बियांची खरेदी करून बळीराजाने काळ्या आईची ओटी भरली पिके बरी दिसत असतानाच आता अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अनियमित पणामुळे हिरावून घेतला आहे साकत परिसरात सतत रिमझिम पाऊस तर अधूनमधून दमदार पाऊस होत असल्यामुळे शेतीची कामे खूरपणी राहिल्यामुळे कामे ठप्प झाली असून शेतातील पिकांना तलावाचे स्वरुप आले आहे.
सोयाबीन व उडीद पिके कुजून जायला लागली आहेत शेतात पाय ठेवला तर गुडघाभर खोल जातो. शेतातील सर्वच पिकांवर परिणाम झाला आहे.
ओल्या दुष्काळाचे सावट जामखेड तालुक्यातील साकत परिसरातील पिंपळवाडी, कडभनवाडी, कोल्हेवाडी तसेच सावरगाव, दिघोळ, जातेगाव, देवदैठण, मोहा, नाहुली, नायगाव या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment