पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/३१ऑगस्ट
खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, विना परवाना रिव्हॉल्व्हर
सारखे घातक शस्त्रे जवळ बाळगून खुनाचा प्रयत्न करने, गैर कायदयाची मंडळी जमवुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करुन अनुचित जमातीच्या व्यक्तीचा खुनाचा प्रयत्न करणे, गैरकायदयाची मंडळी जमवुन खंडणी मागणे, हत्यारासह दरोडा टाकणे तसेच असे विविध कलमान्वये गुन्हे दाखल असलेल्या अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे रा. भवरवाडी ता. जामखेड या जामखेड पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराच्या विरोधात जामखेड पोलीसांनी एम.पी.डी.ए (स्थानबध्द) कायदयान्वये जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांचेकडे सदर केलेल्या प्रस्तावावर कार्यवाही करत आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे यास एक वर्षाकरिता नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले आहे. ही कारवाई दि. २६ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आली आहे.
तसेच जामखेड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या रेकॉर्डवरील आणखी १० ते १२ गुंडांना आगामी गणेशोत्सव व विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने तडीपार व एम.पी.डी.ए (स्थानबध्द) करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्याचे काम सुरु असल्याची माहिती जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली आहे. या कारवाई मुळे जामखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारांवर चांगला वचक निर्माण होऊन बऱ्यापैकी गुन्हेगारी कमी होऊ शकते.
सदरची कारवाई अहमदनगर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, कर्जत विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील, पोलीस हेडकॉन्टेबल बिरप्पा करमल, अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल आजबे, सचिन पिरगळ, दिपक बोराटे, दत्तु बेलेकर यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment