पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/७ऑगस्ट
क्रीडा व शारीरिक शिक्षणशास्त्र विभागातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, क्रीडा व शारीरिक शिक्षणशास्त्र विभागामधील एम.पी.एड., पीएच.डी. अभ्यासक्रमातील २४ विद्यार्थी-विद्यार्थीनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे दि. ०७ एप्रिल, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या 'सहायक प्राध्यापक पात्रता परीक्षेत (सेट)' उत्तीर्ण झाले आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) वतीनं महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा ( Maharashtra SET) म्हणजेच सेट परीक्षेचा काल जाहीर करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं परीक्षा 7 एप्रिल रोजी आयोजित केली होती. या परीक्षेचा निकाल थोड्याच वेळापूर्वी जाहीर करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सेट परीक्षा दिली होती. ते सेट विभागाच्या वेबसाईटवर जाऊन निकाल पाहू शकतात. 39 व्या सेट परीक्षेत 7273 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून 39 व्या सेट परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही परीक्षा 7 एप्रिल रोजी राज्यभरातील विविध शहरातील परीक्षा केंद्रांवर पार पडली होती. विद्यापीठाच्या सेट विभागानं दिलेल्या माहितीप्रमाणं परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 9 हजार 250 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी 7273 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सेट विभागाकडून 5 ऑगस्ट म्हणजे आज सायंकाळी 5 वाजता निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत 7273 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण 6.66 टक्के इतका निकाल सेट परीक्षेचा लागला आहे.
विभागातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर सेवक व विद्यार्थ्यांकडून सर्वांचे अभिनंदन! होत आहे व जामखेड तालुक्यासह खर्डा पंचक्रोशीतील गोकुळ गोपाळघरे यांच्या यशामुळे कौतुक केले जात आहे.
ते खर्डा ग्रामपंचायतीत नागोबाचीवाडी येथील असुन गोकुळ गौतम गोपाळघरे हे मेहनती अभ्यासू वृत्तीने पुणे येथे विद्यापीठात परिक्षा देउन उदरनिर्वाहसाठी काम करतं होतें, खर्डा इंग्लिश स्कूल खर्डा येथे शिक्षणं घेऊन पुढे गेले होतें घरची परिस्थितीत हलाखीची स्थिती आहे हे समजून चिकाटी जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले त्यामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे
No comments:
Post a Comment