पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-८ऑगस्ट
अहमदनगर जिल्ह्यातून अनेक खळबळ उडवून देणाऱ्या घटना सातत्याने समोर येत आहेत. जिल्ह्यातील विविध भागातून महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येताना दिसतात.
दरम्यान आता अवघ्या पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार झाल्याचे वृत्त आले आहे.
धक्कादायक म्हणजे १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने हा अत्याचार केला आहे. ही खळबळजनक घटना नगर शहरातील उपनगरात घडली.
समजलेली अधिक माहिती अशी : ही घटना सोमवारी घडली असून पीडित पाच वर्षाच्या मुलीला खेळण्यासाठी घरच्यांनी सोडले होते. तेव्हा या अल्पवयीन मुलाने तिच्यावर अत्याचार केलाय. पीडितेने तिच्या वडिलांना हा प्रकार सांगितला.
त्यानंतर कुटुंबीयांनी बुधवारी पोलिसांत धाव घेतली. पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली असून १३ वर्षीय मुलाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
No comments:
Post a Comment