पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/९ ऑगस्ट
संपुर्ण महाराष्ट्रातील अध्यात्मिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या भगवान गडावर सर्व महाराष्ट्र भुमी ज्यांना माऊली या संबोधनाने संबोधते अश्या संत ज्ञानेश्वर यांचे भव्य आणि दिव्य असे मंदिर उभे राहत आहे. यासाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून जामखेड तालुक्यातील नागोबाचीवाडी ग्रामस्थांनी ज्ञानाचा अथांग सागर असणारे यान्याचर्य डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. ९ ऑगस्ट रोजी नागपंचमी यात्रेच्या निमित्ताने होतअसलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात ६६ लाख रुपयांची देणगी जाहीर केली.
यावेळी खर्डा ग्रामपंचायतचे माजी सरपंच संजय गोपाळघरे, आसाराम गोपाळघरे, एकनाथ गोपाळघरे, दत्तात्रय गोपाळघरे, बाळासाहेब गोपाळघरे, पुशराम गीते, हनुमंत बारगजे, तुळशीदास गोपाळघरे, डॉ. सोपान गोपाळघरे डॉ. अंकुश गोपाळघरे आदि मान्यवरांसह सर्व नागोबाचीवाडी ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment