पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/९ऑगस्ट
रस्त्यावरुन अनेक शासकीय वाहने जात असतात. त्या वाहनांवर पोलीसांचे बोधचिन्ह, पोलीस किंवा महाराष्ट्र शासन असे लिहिलेले आढळते. मात्र, या गोष्टीचा फायदा काही खाजगी वाहने घेत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे पोलिसांचे बोधचिन्ह, पोलीस अथवा महाराष्ट्र शासनाची पाटी खाजगी वाहनांवर असल्यास संबधित वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना प्रादेशिक कार्यालय मुंबई यांच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबईद्वारे राज्यातील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या खाजगी वाहनांवर पोलीस बोधचिन्ह व पोलीस असे लिहलेले आढळल्यास संबधित वाहनांवर मोटार नियमन अधिकारानुसार कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. या विषयीचे एक पत्रक या कार्यालाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. एका जेष्ठ पत्रकाराने या संबधी इमेल द्वारे तक्रार अर्ज केला होता. त्यांच्या तक्रारी अर्जाची दखल घेऊन प्रादेशिक कार्यालय मुंबई यांनी परिपत्रक काढून संबधित वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश केले आहेत.
No comments:
Post a Comment