पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१२ ऑक्टोबर
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील दिघोळ येथे घराचा दरवाजा उघडून घरातील सामानाची उचकापाचक करुन सोने सह रोख रक्कम घेऊन घरातील मंडळींना मारहाण करून चोरट्यांनी ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की दिघोळ येथील रहिवासी फिर्यादी गोकुळ विष्णु तागड वय २९ वर्ष रा.दिघोळ यांच्या राहत्या घरी बुधवार ९/१०/२४ रोजी पहाटे दरम्यान चोरी झाली. याबाबतची फिर्याद गोकुळ विष्णू तागड यांनी खर्डा पोलीस स्टेशनला दिली आहे . फिर्यादी यांचे घराचे उघडा दरवाजा ढकलुन घरात प्रवेश करुन घरातील लोकांना शिवीगाळ दमदाटी करुन फिर्यादीचे आई व पत्नी यांना धमकी देवुन त्यांच्याकडील सोन्याचे दागीने मागुन घेवुन कपाटाचा दरवाजा उचकटुन त्यात पर्समध्ये ठेवलेले दांगीने चोरुन आरडा ओरड केली तर हातपाय तोडण्याची धमकी देवुन कोणीतरी तीन अज्ञात चोरट्याने स्वत:चे फायद्याकरिता चोरी करुन घेवुन गेले .सुमारे ६२ हजार किंमतीचे सोने सह रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याची तक्रार खर्डा पोलीस स्टेशनला करण्यात आली.
सदर घेटनेचा पुढील तपास खर्डा पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment