पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/16ऑक्टोबर
जामखेड येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे यांच्या कामाची दखल घेत त्यांना भाजपाच्या युवा मोर्चाच्या जामखेड शहराध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
त्यासंदर्भातील नियुक्तीचे पत्र आमदार राम शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.
जामखेड येथे भाजप बैठक कार्यालयात आयोजित आली होती. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशीद, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, माजी पंचायत समिती सभापती डॉ भगवान मुरुमकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, भाजपा शहराध्यक्ष पवण राळेभात, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, अमित चिंतामणी, पांडुरंग माने, शिवकुमार डोंगरे, तुषार बोथरसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे हे जामखेड शहरात समता ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करतात. गोरगरीब सामान्य कुटुंबात लोकांना न्याय देण्याचे काम ते करतात. त्यामुळे त्यांची भाजपाच्या युवा मोर्चाच्या जामखेड शहराध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment